अजिंक्य कांबळे -भाऊ
" तथ्य, पारदर्शकता आणि तुमचा आवाज "
" तथ्य, पारदर्शकता आणि तुमचा आवाज "
अजिंक्य विष्णु कांबळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना — 2009 पासून सक्रीय कार्यकर्ता
व्यवसाय : निर्यातदार
कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने लढा देणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे.
पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सोयी, गुन्हेगारी, तसेच प्रशासनातील भ्रष्टाचार या विषयांवर मी अनेक वर्षांपासून निवेदने, आंदोलनं आणि जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेणे, तातडीने उपाययोजना मागणे आणि गरज भासल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे — हाच माझा कार्यधर्म.
सामाजिक, नागरी आणि मानवतावादी उपक्रमांमध्येही माझा सातत्यपूर्ण सहभाग असून, माझं काम एकच उद्दिष्ट ठेवून सुरू आहे — कोल्हापूरच्या नागरिकांचे जीवनमान अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुलभ बनवणे.
माझी प्रमुख कामगिरी
IRB टोल आंदोलनात सक्रीय नेतृत्व
जरगनगरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि कचरा समस्यांवर सतत लढा
गुटखा विक्रीवरील कारवाईसाठी मोहिम
गॅस ग्राहक जनजागृती व कामगारांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन
महाऑनलाईन, पुरवठा विभाग, विद्यापीठ आणि आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराविरोधात कारवाई
दुष्काळ, पूर आणि कोरोना काळात मदतकार्य
खड्डे बुजवणे, वृक्षारोपण, रक्तदान व शैक्षणिक उपक्रम
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध तीव्र भूमिका